Chalisgaon Firing: भाजचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव (Chalisgaon) येथील कार्यालयात त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार (Balu More Firing Case) झाला होता. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना पाचव्या दिवशी अशोक हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आज (10 फेब्रुवारी) पहाटे पाच वाजणेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या वृत्तामुळे चाळीसगाव परिसरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अज्ञात इसमांकडून बेछुट गोळीबार
महेंद्र उर्फ बाळू मोरे हे भाजपचे माजी नगरसेवक होते. चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात त्यांचे नाव होते. शहरातील हनुमान वाडी येथे त्यांचे कार्यालय आहे. याच कार्यालयात आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. ज्यामध्ये मोरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेतच नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याबाबत पुढे आलेल्या माहितीनुसार, मोरे हे कार्यालयात बसले होते. या वेळी मास्क लावलेले पाच इसम तेथे आले. त्यापैकी तिघांनी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी हे फुटेज मिळवून तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, VIDEO- Abhishek Ghosalkar Shot Dead: शिवसेना यूबीटी नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या; नंतर आरोपी मॉरिस भाईने स्वतःलाही संपवले (Watch))
हल्लेखोर फरार
दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर चाळीसगाव शहरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये घबराट आहे. पोलिसांनी गोळीबार प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतल्याचे अथवा अटक केल्याचे वृत्त नाही. मात्र, तपास कायम आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. पोलिसांनी तातडीने तपास करुन हल्लेखोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी भावना मोरे आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. (हेही वाचा, Ulhasnagar Firing: पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड याचा तुरुंगात अन्नत्याग, जाणून घ्या कारण)
महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय हत्या आणि सूडचक्रामुळे पोलीसही दबावात आहे. पोलिसांवरील नागरिकांचा दबाव वाढतो आहे. उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार. त्यालाच लागून दहिसर येथे शिवसेना (UBT) गटाचे नेते माजी नगरसेवक अभिजित घोसाळकर यांची गोळ्या घालून केलेली हत्या. चाळीसगावमधील माजी नगरेसवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर झालेला बेछुट गोळीबार. त्यात उपचारादरम्यान त्यांचा झालेला मृत्यू अशा एक ना अनेक घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला आहे. पुण्यासारख्या ठिकाणी कोयता गँगची दहशत तर कायमच आहे. त्यामुळे गुन्हेगार जर असे राजरोसपणे गोळीबार करु लागले आणि पोलीस जर बघ्याची भूमिका घेत असतील तर सामान्य माणसांनी करायचे तरी काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.