छगन भुजबळांची तब्येत खालावली; जसलोक रुग्णालयात केले दाखल
Chhagan Bhujbal (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल कले. त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्र टाईम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना आज सकाळी अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या धावपळीत नेत्यांना तहान-भूक हरवून काम करावं लागते. तसेच उन्हा-तान्हात प्रचारासाठी भटकावे लागते. याचाच बहुधा भुजबळांना त्रास झाला असावा असा अंदाज डॉक्टरांकडून वर्तविण्यात येत आहे.

हेदेखील वाचा- मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच, शिवसेना प्रवेशाची माझ्या नावाची चर्चा निराधार: छगन भुजबळ

काही महिन्यांपूर्वी छगन भुजबळ घरवापसी करत शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चांवर पडदा टाकत भुजबळांना शिवसेना पक्षात प्रवेश नाही असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बाळासाहेबांना भुजबळ यांनी दिलेल्या त्रासाचा विसर न पडल्याचेही उद्धव यावेळी म्हणाले. तर काही दिवसांपूर्वी कट्टर शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या पक्षप्रवेशाच्या विरोधात पोस्टर झळकावले होते.