Mumbai Local Train Ticket For Student: राज्यभरासह मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. अशातच आता मध्य रेल्वेकडून महाराष्ट्रातील राज्य सरकारला पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात त्यांनी शाळेत आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वेचे तिकिट मिळण्यासंदर्भात SOP जाहीर करावी अशी मागमी केली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले की, एमएमआर येथील विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी SOP लागू करण्याचा विचार करत आहोत.
शाळा आणि महाविद्यालये ही 4 ऑक्टोंबर पासून सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतील विद्यार्थी रेल्वेच्या तिकिट काउंटवर येत तिकिट किंवा पास देण्याची मागणी करत आहेत. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना तिकिट देण्यासह प्रवासाबद्दल एसओपी जाहीर करण्यात आलेली नाही असे पत्रात पुढे म्हटले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी पाहता राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासासाठी गाइडलाइन्स जाहीर कराव्यात.(मुंबई मधील सिद्धिविनायक आणि मुंबादेवी मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले; 'या' नियमांचे पालन करणे अनिवार्य)
तर शाळेत किंवा महाविद्यालयाचे वर्ग सुरु होण्यापूर्वीच महापालिकेकडून गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार वर्गात एका बाकावर एक विद्यार्थ्याला बसण्यास परवानगी असेल. तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे ही अत्यावश्यक असणार आहे. महत्वाचे म्हणजे आपल्या पाल्याला शाळेत किंवा महाविद्यालयात पाठवण्यापूर्वी त्यांनी समंतीपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. सध्या राज्यभरात 8-12 वी चे वर्ग सुरु करण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई लोकल मध्ये प्रवास करण्यासाठी व्यक्तीचे पूर्णपणे लसीकरण झालेले असावे असा नियम 15 ऑगस्ट पासून लागू करण्यात आला आहे. तर गाइडलाइन्सनुसार, ज्यांचे पूर्ण लसीकरण होऊन 14 दिवस झाले आहेत त्यांनाच लोकलने प्रवास करण्यास परवानगी आहे. परंतु नागरिकाला तिकिटाऐवजी महिन्याभराचा सध्या पास दिला जात आहे.