कल्याणहून (Kalyan) ठाण्याकडे (Thane) जाणारी मध्ये रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज शनिवारी सकाळी पार्सिक बोगद्याजवळ (Parsik tunnel) रेल्वेरुळाला तडे गेल्याने रेल्वे वाहतूक तूर्त थांबण्यात आली आहे. यामुळे कल्याण ते ठाणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी सकाळच्या वेळी जास्त असते. त्यावेळीच वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
पार्सिक बोगद्याजवळ रेल्वेरुळावर तडा गेल्याने कल्याणहून ठाण्याकडे जाणारी मध्य रेल्वेची जलद सेवा आज शनिवारी सकाळपासून थांबवण्यात आली आहे. तसेच या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व रेल्वे धीम्या गतीच्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे ट्रकवर पाठोपाठ लोकलच्या गाड्यांची रांग लागल्याचे दिसत आहे. यामुळे धीम्या गतीच्या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेही मोठे हाल झाले आहेत. लवकरच प्रवाशांच्या या गैरसोयीतून सुटका होईल, असे अश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे. हे देखील वाचा-Western Railway Mega Block Update: पश्चिम रेल्वे मार्गावर 27 ऑक्टोबरला 'मुंबई लोकल' चा दिवसकालीन मेगा ब्लॉक रद्द; आज रात्री अंधेरी- बोरिवली दरम्यान 4 तासांचा ब्लॉक
सध्या पार्सिक बोगद्याजवळ जलद मार्गावर रुळ दुरस्तीचे काम जोरात सुरु आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सरु होईल, असेही मध्य रेल्वेने सांगितले आहे. तसेच प्रवाशांची होणाऱ्या गैरसोयीबदल दिलगिरी व्यक्त केली आहे.