Western Railway Mega Block Update: पश्चिम रेल्वे मार्गावर 27 ऑक्टोबरला 'मुंबई लोकल' चा दिवसकालीन मेगा ब्लॉक रद्द; आज रात्री अंधेरी- बोरिवली दरम्यान 4 तासांचा ब्लॉक
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Mumbai Local Mega Block on 27 October:  मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल सेवा दुरूस्तीच्या कामासाठी दर रविवारी काही तासांसाठी प्रवाशांच्या सेवेसाठी बंद ठेवली जाते. मात्र यंदा नरक चतुर्दशी आणि दिवाळीचा सण रविवार 27 ऑक्टोबरला असल्याने रेल्वे प्रशासनाने या आठवड्याचा मेगा ब्लॉक रद्द करून मुंबईकरांना दिलासा दिला आहे. दिवाळी निमित्त अनेकजण देवदर्शन आणि नातेवाईकांच्या भेटीला जाण्यासाठी बाहेर पडतात. अशावेळेस ऐन सणादिवशी मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून हा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र शनिवार मध्य रात्रीनंतर पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी- बोरिवली स्थानकात रात्रीच्या वेळेस पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

पश्चिम मार्गावरील ब्लॉक

शनिवार (26 ऑक्टोबर) च्या रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेमध्ये ब्लॉक घेऊन दुरूस्तीची कामं केली जातील. अंधेरी ते बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्र कालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मुंबईकर रेल्वे प्रवाशांना 2019 पर्यंत Mumbai Local मध्ये Free WiFi मिळण्याची शक्यता.

रविवारचा दिवसकालीन मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. तसेच सोमवारी दिवाळी पाडवा असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. या दिवशी देखील रविवारच्या वेळापत्रकानुसार रेल्वेची वाहतूक चालवली जाणार आहे.