मुंबईकर रेल्वे प्रवाशांना 2019 पर्यंत Mumbai Local मध्ये Free WiFi मिळण्याची शक्यता
Western Railway (Photo credits: PTI)

लोकल (Mumbai Local)  रेल्वे ही मुंबईकरांसाठी लाईफलाईन आहे. प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असते. सध्या निवडक रेल्वेस्थानकांवर उपलब्ध असलेली मोफत इंटरनेट वायफाय (Free WiFi) सेवा लवकरच पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) प्रवाशांना लोकलच्या डब्यातही मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीला राजधानी (Rajdhani ), शताब्दी (Shatabdi) या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आणि 2019 पर्यंत मुंबई लोकलच्या प्रवाशांना मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने लवकरच लोकलमध्ये वायफाय सेवा देण्यासाठी टेंडर काढणार असल्याची माहिती दिल्याचे वृत्त DNA ने दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीपर्यंत याची टेंडर काढली जातील. त्यानंतर लोकल डब्ब्यामध्ये राऊटर आणि लॅन कॅबल्स बसवल्या जातील. वायफाय कोणत्या टप्प्यापर्यंत वापरलं जाऊ शकतं यासाठी बंधनं असणार आहेत.

मोफत इंटरनेट सेवेला उत्तम प्रतिसाद

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोफत मिळणार्‍या केवळ नोव्हेंबर महिन्यात सुमारे 22 लाख प्रवाशांनी 715 TB डाटा वापरला आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवर ठाणे आणि पनवेल आणि पश्चिम रेल्वेवर अंधेरी रेल्वे स्थानकावर वायफायचा वापर सर्वाधिक करण्यात आला आहे.