Central Railway New Year Special Local Trains: नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मध्य रेल्वे चालवणार सीएसएमटी ते कल्याण, पनवेल विशेष लोकल सेवा
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

New Year Special Local Trains on Central and Harbour Line : 2020 या नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरात 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईकरांचे खास प्लॅन्स असतात. रात्री उशिरा सेलिब्रेशननंतर घरी परतताना मुंबईकरांचे हाल होऊ नयेत म्हणून मध्य रेल्वे खास ट्रेन चालवणार आहे. यामध्ये मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT) ते कल्याण (Kalyan) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल (Panvel) अशा मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर खास ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या ट्रेन्स 31 डिसेंबरच्या रात्री चालवल्या जातील.

मध्य रेल्वे प्रमाणेच पश्चिम रेल्वे मार्गावरही चर्चगेट ते विरार दरम्यान विशेष लोकल ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. मुंबई लोकलप्रमाणेच मुंबई, पुणे येथून लांब पल्ल्यांच्या देखील विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने कोकण, गोवा मध्ये जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. Western Railway New Year Special Local Trains: 2020 सेलिब्रेशन दरम्यान मुंबईकरांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे चालवणार विशेष लोकल्स; चर्चगेट-विरार दरम्यान धावणार 8 ट्रेन्स.

मध्य रेल्वे चालवणार विशेष ट्रेन्स 

2020 या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी खास सेलिब्रेशनची सोय करण्यात आली आहे. नववर्षांचे दणक्यात स्वागत करण्यासाठी बार देखील पहाटे पाच वाजेपर्यंत तर मद्यविक्रीची दुकाने मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.