Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

नवंवर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी सध्या सर्वत्र तयारी सुरू आहे. दरम्यान 31 च्या रात्री अनेक मुंबईकर घराबाहेर पडून या सेलिब्रेशनचे प्लॅन करतात. अशावेळेस मुंबईकरांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) 8 विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या विशेष लोकल्स 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री धावतील. यामध्ये चर्चगेट ते विरार (Churchgate to Virar) अशा 4 आणि विरार ते चर्चगेट (Virar to Churchgate) अशा 4 ट्रेन्स धावणार आहेत.

सध्या मुंबईसह देशभरात ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनची धामधूम सुरू आहे. 2020 या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी खास सेलिब्रेशनची सोय करण्यात आली आहे. ख्रिसमस आणि नववर्षांचे दणक्यात स्वागत करण्यासाठी बार देखील पहाटे पाच वाजेपर्यंत तर मद्यविक्रीची दुकाने मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. Konkan Railway Christmas/New Year Special Trains: ख्रिस्मस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशन साठी कोकण रेल्वेमार्गावर चालवल्या जाणार 5 विशेष ट्रेन्स; पहा संपूर्ण यादी.

 

पश्चिम रेल्वे ट्वीट

मुंबई लोकलप्रमाणेच मुंबई, पुणे येथून लांब पल्ल्यांच्या देखील विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने कोकण, गोवा मध्ये जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत.