Senior Citizens Reserved Coach In Central Railway (Photo Credits: Wikkimedia Commons)

मुंबई लोकलची (Mumbai Local) वाढती गर्दी पाहता ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) प्रवाशांसाठी मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने एक मोठा निर्णय घेण्याचे योजले आहे. यानुसार यापुढे लोकलच्या एकूण चार मालडब्ब्यांपैकी एक हा पूर्णतः ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव करण्याचा रेल्वेचा मानस आहे. टाईमच्या वृत्तानुसार, या निर्णयासाठी प्राथमिक चाचपणी सदःय सुरु असल्याचे समजतेय. वास्तविक आता सुद्धा लोकलमधील विशिष्ट डब्ब्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत पण डब्ब्यात चढताना असणारी गर्दी पाहता त्या सीट पर्यंत पोहचणे सुद्धा कित्येकदा शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेता एक मालडबा पूर्णतः जेष्ठांसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. (सिनियर सीटीझन्ससाठी सरकारच्या 'या' योजना येतील कामी, जाणून घ्या)

प्राप्त माहितीनुसार, मालडब्याचे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डब्यात रूपांतर करण्यासाठी कारशेडमधील अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येईल. सुरुवातीला केवळ एका लोकल मध्ये ही प्रायोगिक चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी ठरल्यास पुढे मध्य रेल्वेच्या अन्य लोकलमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  (Central Railway Recruitment: रेल्वेमध्ये दहावी पास असणाऱ्यांसाठी मेगा भारती, असा भरू शकता अर्ज )

सध्या 12 डब्यांच्या लोकलमध्ये महिला, प्रथम दर्जा, दिव्यांग आणि मालडबा असे राखीव डबे आहेत. मात्र ज्येष्ठांसाठी विशेष डबा ऐवजी केवळ 7 राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची वाढती संख्या पाहता ही गैरसोय होत असल्याचे अनेक प्रवासी संघटनांचे म्हणणे होते. यावर आता अखेरीस मध्य रेल्वेकडून तोडगा काढण्याचा विचार केला जात आहे.