मध्य रेल्वेच्या कसारा ते आसनगाव मार्गादरम्यान लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळावरून घसरल्याने ही वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे कसाऱ्याहून एकही लोकल पुढे येऊ शकली नाही. ऐन सकाळीच प्रवासाचा खोळंबा झाल्याने प्रवाशी चांगलेच संतापले आहेत. संताप अनावर झाल्याने प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेल रोको केला. आगोदरच्या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झालीच पण, प्रवाशांनीही रस्ता रोको केल्यामुळे आणखी उशीर होतो आहे, असे सांगतानाच घडलेल्या घटनेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सकाळी ११ वाजेपर्यंत काम पूर्ण होऊन वाहतूक पूर्ववत होईल, असे ट्विट मध्य रेल्वेने केले आहे.
व्हानला मागाडीची धडक
प्राप्त माहितीनुसार, ओव्हरहेड दुरुस्त करणारी व्हॅन आणि मालगाडी यांच्यात धडक झाली. त्यामुळे व्हॅन रुळावरून घसरली. मालगाडीने व्हॅनला धडक दिली. या प्रकारामुळे केवळ लोकल सेवाच नव्हे तर, लांब पल्ल्याच्या ८ ते १० गाड्यांनाही फटका बसला आहे. या गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी रखडल्या आहेत. या गाड्या धीम्या मार्गावरून पुढे काढण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला. मात्र, संतापलेल्या प्रवाशांनी याही गाड्या आडवल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीवरचा ताण आणखी वाढला आहे. दरम्यान, बिघाड दुरुस्त करून वाहतूक सुरु व्हाययाल साधारण एक ते दीड तास लागणार आहे. तोपर्यंत वाहतूक ठप्पच राहणार आहे.
During the night time maintenance work of OHE between Asangaon and Kasara, a tower wagon derailed. Restoration work is going on at war footing. However, traffic is likely to be affected between Asangaon and Kasara up to 7 or 8 am. Inconvenience is deeply regretted.
— Central Railway (@Central_Railway) September 14, 2018
मुंबईकडे येणाऱ्या या गाड्यांचा खोळंबा
११०६२ दरभंगा एलटीटी पवन एक्स्प्रेस
११०५८ अमृतसर मुंबई एक्स्प्रेस
११०१६ गोरखपूर एलटीटी कुशीनगर एक्स्प्रेस
१८०३० शालिमार एलटीटी एक्स्प्रेस
१२८१० हावडा मुंबई मेल व्हाया नागपूर
११४०२ नागपूर मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस
१२११२ अमरावती मुंबई एक्स्प्रेस
१२१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
१२१३८ फिरोजपूर मुंबई पंजाब मेल
१७०५८ सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्स्प्रेस
११०२५ भुसावळ पुणे एक्स्प्रेस
१२६१८ मंगला एक्स्प्रेस
२२१०२ मनमाड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस