Ticketless Passengers | (Photo Credit - X)

Kalyan Railway Station News: मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांना पायबंध घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील विविध स्टेशन्सवर तिकीट तपासणीस तैनात करण्यात आले. सोशल मीडिया मंच 'X' द्वारे या अभियानाची माहिती देताना रेल्वेने (Central Railway In Action) काहीसे फिल्मी अंदाजात संदेश दिला आहे. विनातिकीट प्रवाशांना (Ticketless Passengers) उद्देशून दिलेल्या संदेशात रेल्वेने म्हटले आहे की, "तुम हमसे फिर से छुप रहे हो... और हम तुम्हारा स्टेशन पे फिर से इंतजार कर रहे हैं!" धक्कादायक म्हणजे केवळ एका दिवसात कल्याण स्टेशनवर तब्बल 4438 प्रावासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 16.85 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अधिक माहिती देताना मध्य रेल्वेने म्हटले आहे की, रेल्वे प्रशासनाकडून सोमवारी (16 ऑक्टोबर 2023) या दिवशी मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी विविध स्टेशन्सवर तिकीट तपासणीस तैनात करण्यात आले. साधारण सकाळी 7.00 ते रात्री 11.00 या कालावधीत 167 तिकीट तपासणीस तर जवळपास 35 इतर अधिकारी तैनात होते. या सर्वांनी मिळून केलेल्या वेगवेगल्या कारवायांमध्ये तब्बल 4438 विनातीकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 16.85 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

प्रत्येकी एका तिकीट तपासणीसाने एकूण मोहिमेदरम्यान सरासरी 27 विनातिकीट प्रवासी पकडले. त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेली सरासरी रक्कम ही 10095 रुपये इतकी होती. दरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवास करताना तिकीट खरेदी करा आणि विवहीत तिकीटानुसारच प्रवास पूर्ण करा. तसेच, जर एखाद्या प्रवाशाने चुकून अथवा काही कारणाने तिकीट खरेदी केले नसेल आणित्याच्यावर कारवाई होत असेल तर कृपा करुन तिकी तपासणीस आणि प्रशासनास सहकार्य करा.

'X' पोस्ट

मध्य रेल्वे नेहमीच गर्दीने तुडूंब भरलेली असते. अशा वेळी विनातीकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. या प्रवाशांमुळे तिकीट असलेल्या प्रवाशांवर अन्याय होतोच. मात्र, त्यांना हक्क असूनही सुखकर प्रवास करता येत नाही. दुसऱ्या बाजूला विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेचा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडतो. ज्याचा रेल्वेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. परिणामी तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या किंवा पुरल्या जणाऱ्या सेवांवरही मर्यादा येतात. रेल्वे डब्यांमध्ये अकारण गर्दी वाढते. त्यामुळे अनेकदा प्रवाशांमध्ये तंटे-बकेडे निर्माण होतात. त्यामुळे रेल्वे अधूनमधून तिकीट तपासणी मोहीम राबवते.