मध्य रेल्वेने (Central Railway) आता विना तिकीट प्रवास करणार्यांकडून ऑनलाईन दंड वसूल करण्यासाठी नवं अॅप लॉन्च केले आहे. आजपासून मध्य रेल्वेत (Central Railway) टीसी (TC) स्मार्टफोनच्या माध्यमातूनही आता दंड आकरतील. आता मध्य रेल्वेच्या टीसींना एक मोबाईल अॅप देण्यात आले आहे. ज्याच्यामध्ये बॅंकेसोबत टाय अप करून दंड आकारण्यासाठी खास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आज 50 तिकीट तपासनिकांसोबत बॉडीकॅमची सोय देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेचं नवं अॅप केवळ विनातिकीट प्रवाशांसाठी नव्हे तर तिकीट तपासनिकांदेखील फायदेशीर असणार आहे. या अॅप मुळे आता तिकीट तपासण्याची प्रक्रिया सुकर होणार आहे. तसेच प्रवाशांना सुट्टे पैसे देण्याची कटकट दूर होईल. ही प्रक्रिया अधिक सोप्पी देखील होणार आहे.
मागील आर्थिक वर्षामध्ये 18 लाख पेक्षा अधिक विनातिकीट प्रवासी पकडले गेले होते. तर सुमारे 100 कोटी पेक्षा जास्त रक्कम दंडच्या स्वरूपात गोळा करण्यात आली होती. डाटा नुसार, सुमारे 5 हजार पॅसेंजर नियमित विनातिकीट प्रवास करत असतात. नक्की वाचा: Viral Video: विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसीची बेदम मारहाण: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन TC निलंबित, Watch .
तिकीट तपासिकांना अनेकदा सुट्टे पैसे देण्यासाठी गर्दीने भरलेल्या ट्रेन मध्ये फिरणं कठीण वाटतं. तर अनेकदा प्रवासी देखील आपल्याकडे सुट्टे पैसे नाहीत, पैसेच नाहीत अशा सबबी पुढे करतात. त्याला मात्र यामधून आता पर्याय मिळाला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर आता 50 तिकीट तपासिकांना बॉडीकॅम दिले जाणार आहेत. आता ड्युटीवर असणार्या टीसींच्या शर्ट पॉकेट जवळ कॅमेरा असेल. या कॅमेर्यातून रेकॉर्ड झालेल्या गोष्टी महिनाभर राहणार आहेत. तिकीट तपासणीमध्ये काही विसंगती आढळल्यास किंवा प्रवाशांकडून तक्रारी नोंदवल्या गेल्यास वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ फुटेजवरून रिव्ह्यू करतील.