Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

मडगाव-सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेसच्या (Konkan Kanya Express) इंजिनात अचानक बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे (CSMT) येणारी ही गाडी जागीच अडकून पडली असून त्याचा फटका मध्य रेल्वेला (Central Railway) बसला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मस्जिद स्थानंकादरम्यान जलद मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचे तीनतेरा वाजल्याने नोकरीवर जाणा-या चाकरमानी रुळांवरुन चालत जाऊन स्टेशन गाठताना दिसत आहे. कोकणकन्या एक्सप्रेस बंद पडल्याने मध्य रेल्वेची अप मार्गांवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वेच्या रोज काही ना काही समस्या उद्भवत असतात. यातच आज सकाळी मडगाव वरुन सीएसएमटीला येणारी कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने ती जागीच अडकून पडली असून त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. ज्याचा परिणाम म्हणून मध्य रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे.

इंजिनातील बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्यानं अप जलद मार्गावरील लोकल उशिरानं धावणार आहेत. समस्यांचे माहेरघर झालेल्या मध्य रेल्वेला आज कोकणकन्या एक्सप्रेसमुळे पुन्हा एकदा समस्येला सामोर जावे लागत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नोकरीवर जाणा-या चाकरमान्यांनी ऐन गर्दीच्या वेळी ही समस्या निर्माण झाल्याने बराच त्रास सहन करावा लागत आहे.