जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रकरणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Sharad Pawar, Gopichand Padalkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं (statue of Ahilya Devi Holkar) अनावरण करण्याचा प्रकार भाजपा नेते गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) यांना महागात पडण्याची शक्यता आहे. दरम्यान या पुतळ्याचे अनावरण उद्या (13 फेब्रुवारी) दिवशी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पण त्याआधीच गोपीचंद पडळकर यांनी पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरोधात जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे, पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आज गोपिचंद पडळकर पहाटे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह पोहचले. त्यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप त्यांना रोखलं आहे. आता नियोजित वेळापत्रकानुसार उद्या शरद पवार अहिल्याबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करतील अशी प्रक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

शरद पवार यांच्यावर गोपिचंद पडळकर यांनी भ्रष्टाचारी व जातीयवादी असल्याचा आरोप लावला आहे. त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावू नये, या पुतळ्याचं अनावरण करू नये, अशी अनेकांची भावना होती. त्यामुळे स्वतः या पुतळ्याच्या अनावरणाला पोहचले होते. दरम्यान आज पुण्यामध्ये पत्रकार परीषदेमध्ये बोलाताना अजित पवारांनी देखील डिपॉजिट जप्त झालेल्या अशा व्यक्तीकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.