Mumbai Rape: मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून गुप्तांगात घातला लोखंडी रॉड, पीडिताची प्रकृती चिंताजनक
Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडला (Nirbhaya Case) अजूनही लोक विसरले नाहीत. यातच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) 'निर्भया'सारखी हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या साकीनाका (Sakinaka) परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) करून नराधमाने तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घातल्याचा अमानुष प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (9 ऑगस्ट) मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहे. तर, पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या साकीनाका येथील खैराणी रोड परिसरात आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घातला. पीडिताला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच या घटनेत आणखी काही जणांचा सहभाग असल्याची पोलिसांनी शक्यता व्यक्त केली आहे. महिलेवर ज्या प्रकारची क्रूरता करण्यात आली आहे, ते पाहून दिल्लीच्या निर्भया प्रकरणाच्या आठवणी मनात उफाळून आल्या आहेत. हे देखील वाचा- Thane: दिवा येथील साबा गावातील 'गणेश तलावा'त सापडला 33 वर्षीय महिलेचा मृतदेह; तपास सुरु

एएनआयचे ट्वीट-

विशेष म्हणजे पुण्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कारासारख्या हादरवणाऱ्या तीन घटना ताज्या असताना आता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही अशाप्ररकारची घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाच्या कामकाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.