Bhavana Gawli यांच्या विरोधात अकोला स्थानकात घोषणाबाजी; आमदार नितिन देशमुख, खासदार विनायक राऊतांविरूद्ध गुन्हा दाखल
Akola Station | Screen Grab

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गट (Shinde Camp) विरूद्ध ठाकरे गट (Thackeray Camp) यांनी अनेकदा एकमेकांसमोर येऊन राडेबाजी केली आहे. नुकताच असा एक प्रकार अकोला स्टेशन वर झाला. खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि भावना गवळी (Bhavana Gawli) एकाच वेळी स्टेशन वर दाखल झाल्यानंतर घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाकडून 'गद्दार गद्दार'च्या घोषणा देण्यात आला. पण यावरूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार भावना गवळी आणि खासदार विनायक राऊत विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे येत असताना हा घोषणाबाजीचा प्रकार घडला आहे. भावना गवळींना पाहून अकोला स्थानकात ठाकरे गटाने घोषणाबाजी केली त्यामध्ये ‘50 खोके एकदम ओके,’चा देखील पुन्हा आवाज घुमला. गवळी यावरून संतापल्या आणि त्यांनी बुधवारी लोहमार्ग पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. विनायक राऊत आणि नितिन देशमुख यांनी चिथावणी दिल्यानेच माझ्याविरोधात घोषणाबाजी झाली. त्यांच्या पत्नी, मुलीबद्दल असे कृत्य झाले असते, तर त्यांना चालले असते का? असा सवाल देखील भावना गवळींनी विचारला आहे. ठाकरे गटाविरूद्ध कलम २९४ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की वाचा: Thackeray VS Shinde Camp: अकोला स्थानकात एकाचवेळी विनायक राऊत यांच्यासमोर भावना गवळी येताच ठाकरे गटाकडून 'गद्दार... गद्दार च्या घोषणा (Watch Video).

भावना गवळी यांच्या निषेधार्थ शिंदे गटाकडून बुधवारी संध्याकाळी शिंदे गटाकडून आंदोलनं देखील करण्यात आली आहेत. Maharashtra Politics: महाराष्ट्र सांभाळता आला नाही, बिहार फिरून आले, आदित्य-तेजस्वी भेटीवर भावना गवळी यांची बोचरी टीका .

भावना गवळी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला होता. त्यानंतर खासदार भावना गवळींनी अनेकदा उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपली बाजू मांडताना भाजपा सोबत समझोता करून चालू असा सल्ला दिला होता. पण त्याला समोरून प्रतिसाद न मिळाल्याने आमदारांपाठोपाठ खासदारही फुटले तेव्हा भावना गवळी उद्धव ठाकरेंपासून वेगळ्या झाल्या.