Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी ऍड. दिग्विजय त्रिवेदी (Digvijay Trivedi) यांच्या वाहनाला (Car Accident) अपघात झाला आहे. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) मेंढवन खिंडीत हा अपघात झाला आहे. या अपघातात ऍड. दिग्विजय त्रिवेदी यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांच्यासह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच जखमी महिलेला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघात कशामुळे झाला? याची स्थानिक पोलीस कसून चौकशी करत आहेत. महत्वाचे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत असताना ही दुर्देवी घटना समोर आली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन खिंडीत बुधवारी सकाळी दिग्विजय त्रिवेदी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. दिग्विजय त्रिवेदी यांच्यासह कारमध्ये असलेल्या जखमी महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, स्वत: दिग्विजय त्रिवेदी वाहन चालवत होते. तसेच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे. दिग्विजय त्रिवेदी हे बहुजन विकास आघाडीचे विधी सेलचे जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार हाताळत होते. मात्र, त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी शोककळा व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर संपूर्ण माहिती द्यायची नसेल तर लाईव्ह येऊन देशाला संभ्रमात का टाकतात? प्रकाश आंबेडकर यांची 20 लाख कोटींच्या पॅकेजवर टीका

ट्वीट-

कोरोना विषाणूचे संकट असताना संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे अपघातांच्या संख्ये मोठी घट झाल्याचे दिसत असताना दिग्विजय त्रिवेदी यांच्या वाहनाला मोठा अपघात झाला आहे.