Sangli Accident: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात पुणे-बेंगळुरू महामार्गावर (Pune-Bangalore Highway) रस्त्याच्या कडेला भरलेल्या कंटेनर ट्रकला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. शनिवारी सांगलीतील कासेगाव परिसरात येवलवाडी फाट्याजवळ कार पुण्याहून कोल्हापुरातील जयसिंगपूरकडे जात असताना हा अपघात झाला.
कासेगाव पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “अपघातानंतर कारचे गंभीर नुकसान झाल्यामुळे कार वेगात होती असे प्रथमदर्शनी दिसते. त्यात बसलेल्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला." (हेही वाचा - Mumbai: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका दिवसात 40,320 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई)
या अपघातात अरिंजय शिरोटे (वय, 35), स्मिता शिरोटे (वय, 38), पूर्वा शिरोटे (वय,14), सुनेषा शिरोटे (वय,10) आणि वीरू शिरोटे (वय, 4 वर्ष) यांचा मृत्यू झाला. अरिंजय शिरोटे हे जयसिंगपूर येथील नातेवाइकांना सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, नौदल अधिकारी आपली वहिनी आणि तीन पुतण्यांना घरी सोडण्यासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.