कर्जत-नेरळ रोडवर (Karjat Neral Road ) डिकसळ येथे कार आणि रिक्षाच्या धडकेत (Road Accident) सीएनजीचा मोठा स्फोट झाला आहे. या अपघातात 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. दोन्ही वाहनांची पेट घेतल्यामुळे दुर्देवाने स्थानिक नागरिकांना मदत करता आली नाही. तात्काळ मदत मिळाली असते तर जीव वाचवता आला असता, असे मत घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत-नेरळ रोडवर दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास हुंदई कार आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली आहे. या धडकेत सीएनजी टाकीचा मोठा स्फोट झाला. या स्फोटोत दोन्ही वाहनांनी पेट घेतला आहे. या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 महिला, 1 पुरूष आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Chemical Leak Pune: पुण्यातील गरवारे कॉलेज परिसरातील सेंट्रल मॉल पार्किंगमध्ये गॅसगळती, धोका टळला
न्युज 18 लोकमतचे ट्वीट-
कर्जतवरून नेरळकडे जाणाऱ्या रोडवर कार -रिक्षाचा भीषण अपघात, 4 ठार pic.twitter.com/2aYjQ9RdPq
— News18Lokmat (@News18lokmat) March 29, 2021
हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही वाहन जळून खाक झाली आहेत. या अपघातात मरण पावलेल्या लोकांची नावे अद्याप कळू शकलेल नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.