Aurangabad: कारमध्ये स्फोट, जोडप्याचा होरपळून जागीच मृत्यू; औरंगाबाद येथील घटना
Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट (Car Blast) झाल्याने कारमध्ये बसलेल्या जोडप्याचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना औरंगाबद (Aurangabad) जिल्ह्यातील चिकलठाणा पोलीस स्टेशन (Chikalthana Police Station) हद्दीत घडली. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार कारमध्ये मृत्यू झालेले जोडपे हे प्रेमी युगुल असावे. दुपारी साधारण दोन वाजणेच्या सुमारास एका व्यक्तीने गंधेली शिवारात स्फोटाचा आवाज ऐकला. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी पाहणी केली असता एक पांढऱ्या रंगाची कार तिथे उभा असल्याचे पाहायला मिळाले.

पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झालेल्या कारमध्ये एक मृत महिला आणि मृत पुरुष अर्धवट जळालेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. रोहिदास गंगाधर अहेर असे पुरुषाची प्राथमिक ओळख पुढे आली आहे. महिलेची मात्र ओळख अद्याप पटू शकली नाही. चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी अंदाज वर्तवत म्हटले आहे की, घटना घडली त्या वेळेस वाहन सुरु असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कारमध्ये लावण्यात आलेल्या सिलिंडरच्या टाकीचा स्फोट झाला असावा. मृतांच्या शररीरावर मोठ्या प्रमाणावर व्रणही आढळून आले आहेत. चिकलठाणा पोलिसांनी म्हटले आहे की, ऑरेन्सीक आणि ऑटोप्सी अहवालानंतर अधिक माहिती पुढे येऊ शकेल. (हेही वाचा, OnePlus Nord 2 चा पुन्हा एकदा मोठा स्फोट; जळाली युजरची मांडी, कंपनी म्हणते... (See Photos) )

दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत तरी कयास बांधला आहे की, कारमध्ये मृतावस्थेत आढळलेलेले जोडपे हे प्रेमी युगुलच असावे. पोलिसांनी अद्याप तरी प्रकरणाची सवीस्तर माहिती दिली नाही. अपघातग्रस्त वाहनांचे फॉरेन्सीक टीमने अनेक पुरावे गोळा केले आहेत. घटनेचा तपास अद्यापही सुरुच आहे.