Accident News: छत्रपती संभाजीनगरहून जाताना कारचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
Samruddhi Mahamarg, Accident (PC - ANI/File Photo)

Accident News: समुध्दी महामार्गावर शुक्रवारी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. महामार्गावरून जात असलेल्या कारचा भीषण अपघाता झाला आहे.या अपघातात दोन जणांचा मृत्यू तक अन्य दोन जण जखमी झाले आहेत. अपघात छत्रपती संभाजीनगर गावाजवळ घडला आहे. कारची धडक महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला लागली.  हेही वाचा- ट्रक आणि टेम्पोच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू, बुलढाणा येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून जाताना,कारची जोरदार धडक लागली. या अपघातात राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (३५) सरवदे (३७) यांचा मृत्यू झाला. तर रितेश भानादकर (२४) आणि आशिष सरवदे (३७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला आहे.

कारमधील प्रवाशी हे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने भंडारा येथील पदाधिकारी मुंबईला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्या करिता गेले होते.  मुंबईहून काम आपटून परतत असताना, हा अपघात घडला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमींना जिहा रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.