Accident Video: ट्रक आणि टेम्पोच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू, बुलढाणा येथील घटना
Accident (PC - File Photo)

Accident Video: बुलढाण्यात टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे.या अपघातात २ जण ठार झाले आहेत तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ट्रक आणि टेम्पोची एकमेकांना धडक लागली. या अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक सेवा कोंडी झाली होती. हा अपघात ८ मार्चच्या दुपारी घडला आहे. तालसावाजा गावावरून जात असताना हा अपघात घडला आहे. (हेही वाचा- तुर्भे आगारात उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बसला आग; 2 बसचं नुकसान)

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील तालसावाजा गावा जवळ हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णलयात उपचार सुरु आहे. ट्रक चालकाचे गाडीवर नियत्रंण सुटल्याने पुढे टेम्पोला धडक लागली. या धडकेत भीषण अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की, गाडी रस्त्यावर पलटली.

पोलिसांनी अपघातस्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले. मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. वाहतुक कोंडी झाल्याने पोलिसांनी वाहतुक सेवा सुरळीत केली.  पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे. घटनेट ट्रक आणि टेम्पोचे नुकसान झाले आहे. सततच्या अपघातामुळे नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न चिन्हा उपस्थित केला आहे.