दारूच्या दुकानांसमोर रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा; खासदार इम्तियाज जलील यांची राज्य सरकारकडे मागणी
Imtiyaz Jaleel | ((Photo credit: archived, modified, representative image))

दारूच्या दुकानांसमोर रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांची राज्य सरकारकडे केली आहे. दारू खरेदी करण्याएवढा पैसा ज्यांच्याकडे आहे ते अन्नधान्यदेखील खरेदी करू शकतात. त्यामुळे वाइन शॉप सुरू झाल्यानंतर लगेचचं दुकानांसमोर रांगा लावणाऱ्यांचे रेशन कार्ड (Ration Cards) रद्द करण्यात यावे, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

सध्या देशात तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आतापर्यंत 3 वेळा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. दरम्यान तीसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य सरकारने ग्रीन झोनमध्ये वाईन शॉप उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दारूच्या दुकानांसमोर नारगरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. तळीरामांनी दारूच्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका उद्धभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलील यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. लॉकडाऊन काळात दारूचे दुकानं सुरू करण्याचा सरकारचा निर्णय लज्जास्पद असल्याचही जलील यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - पंढरपूर आषाढी वारी 2020 वर यंदा कोरोनाचं सावट? पालखी सोहळयांचे प्रमुख राज्य सरकार सोबत करणार चर्चा)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं आम्ही कौतुक करत होतो. मात्र, आता ते सगळं व्यर्थ आहे. औरंगाबादमध्ये एकही दुकान आम्ही उघडू दिलं नाही. रेड झोनमधील इतर आमदार, खासदार या मृत्यूच्या खेळाला का आमंत्रण देत आहेत? कदाचित ते देखील बेवडे असावेत, असं मत जलील यांनी व्यक्त केलं आहे.