Photo Credit- X

Mahakumbh 2025: देश आणि जगभरातून भाविक महाकुंभ 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. येणारे भाविक संगमावर श्रद्धेचे स्नान करत आहेत. त्यामुळे महाकुंभ (Mahakumbh) अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्रे बनले आहे. यूपी सरकाने रेल्वे, रस्ते मार्गांनी भाविकांना प्रयागराजमध्ये दाखल होण्यासाठी सोय केली असतानाच आता भाविक हेलिकॉप्टर राईडचाही प्रयागराजमध्ये वापर करू शकत असल्याचे समोर आले आहे. हेलिकॉप्टर राईडने नागरिक प्रयागराजमध्ये महाकुंभाचा आनंद घेऊ शकतात. त्यासाठी आकारले जाणारे शुक्लही सर्वसामान्यांच्या दरात आहे. अवघ्या 1,296 रूपयांमध्ये हेलिकॉप्टरमधून महाकुंभ पाहता येणार आहे.(हेही वाचा: Maha Kumbh 2025 Hi-Tech: हायटेक महाकुंभमेळा,  AI चलित चॅटबॉट्स,जल रुग्णवाहिका, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या देखरेखीमुळे वाढली सुरक्षा; घ्या जाणून)

आजपासून हेलिकॉप्टर प्रवास

भाविकांना महाकुंभात हेलिकॉप्टरने प्रवास करायचा असेल तर त्याला 1,296 रुपये द्यावे लागतील. पूर्वी हेलिकॉप्टर प्रवासासाठी 3000 रुपये आकारले लाज होते. हेलिकॉप्टर राईड आज म्हणजेच सोमवारी डिजिटल लाँचने सुरू होईल. उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीर सिंह यांनी सांगितल्या प्रमाण हेलिकॉप्टरचा प्रवास सात ते आठ मिनिटांचा असेल. या वेळी, भाविकांना आकाशातून भव्य महाकुंभ क्षेत्राचे एक अनोखे दृश्य पाहता येईल.

येथून बुकींगची सुविधा

तिकिटे बुक करायची असतील तर www.upstdc.co.in द्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतो. भारत सरकारचा उपक्रम, पवन हंस, भाविकांना हेलिकॉप्टर राइडची सुविधा देईल. पण हेलिकॉप्टर तिकिटाची किंमत मागणीवर अवलंबून असेल.

ड्रोन आणि लेसर शो

महाकुंभ दरम्यान, देशभरातील प्रसिद्ध कलाकार प्रयागराजमध्ये उभारलेल्या विविध रंगमंचावर लाईव्ह शो सादर करतील. लेसर आणि ड्रोन शो देखील आयोजित केले गेले आहेत. भाविकांना विशेष कार्यक्रम देखील पाहता येतील. यात, उत्तर प्रदेश पर्यटन, जलक्रीडा आणि साहसी खेळ यांचा समावेश आहे.

महाकुंभात दिग्गज कलाकारांचे सादरीकरण

16 जानेवारी रोजी महाकुंभातील गंगा पंडालमध्ये गायक शंकर महादेवन उद्घाटन कार्यक्रम करतील. 24 फेब्रुवारी रोजी मोहित चौहान यांचे समारोपीय सादरीकरण होईल.