Aaditya Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुंबई महापालिकेने (BMC) केलेल्या खर्चावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (CAG ) ताशेरे ओढले आहेत. बीएमसीच्या कारभारात पारदर्शकता आण निधिचे गैरव्यस्थापन झाल्याचे कॅगने म्हटले आहे. तसेच, काही निधीचे वाटप निविदा न मागवताच झाल्याचा ठपकाही कॅगने ठेवला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी भाजप आगामी काळात वापर करेल असे दिसते. दरम्यान, राज्याचे माजी पर्यटनमंत्री आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray यांनीही कॅगच्या अहलावार प्रतिक्रिया (Aaditya Thackeray On BMC CAG Report) दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, आम्ही कॅगच्या अहवालाचे स्वागत करतो. नागरिकांना आमच्या कामाची माहिती आहे. गेल्या 25 वर्षांत त्यांनी आम्हाला निवडून दिले. मुंबई महापालिकेचे अनेक घोटाळे आम्ही उघडकीस आणले असून, कालही एक घोटाळा उघडकीस आला. हे सर्व घोटाळे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत होत आहेत. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे महापालिकांची कॅग द्वारे चौकशी करावी, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Uddhav Thackeray यांचे Raj Thackeray यांना प्रत्युत्तर, म्हणाले - ते मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील पात्रासारखे)

ट्विट

मुंबई महापालिकेतील कामांचे कॅगद्वारे ऑडीट करुन विविध चौकशा आणि कारवाया करायच्या. त्याद्वारे उद्धव ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना आणि काही प्रमाणात पालिकेतील अधिकाऱ्यांनाही जेरीस आणायचे असा सत्ताधारी गटाचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. दरम्यान, पाठिमागील 25 वर्षे मुंबईवर शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेत असतानाच्या काळात झालेल्या विकासकामे आणि दिल्या गेलेल्या इतर सर्व कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदारांनी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य ती चौकशी यंत्रणेद्वारे करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. तसेच, या वेळी कॅग अहवालात पुढे आलेला हा केवळ ट्रेलर आहे. चित्रपट अद्याप बाकी आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.