Pune Rape: आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या तरूणीवर कॅब चालकाचा बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या एका तरूणीवर कॅब चालकाने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यात (Pune) घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संबंधित कॅब चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून पीडितावर बलात्कार केला. एवढेच नव्हेतर, पीडित तरूणीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे. संबंधित घटना 4 ते 30 एप्रिल दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.

प्रेमोद बाबु कनोजिया असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पुण्यातील कर्वेनगर परिसरातील रहिवाशी आहे. तर, पीडित तरूणी ही खाराडी येथील रहिवाशी असून पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत आहे. पीडताचे नवऱ्यासोहत पटत नसल्याने ती आपल्या पतीपासून विभक्त राहते. पीडिताने गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीतील काम संपवल्यानंतर घरी जाण्यासाठी ओला कॅब बूक केली होती. यावेळी आरोपी कॅब घेऊन पीडितेला घेण्यासाठी आला. त्याचदरम्यान आरोपीने पीडिताचा मोबाइल नंबर आपल्या फोनमध्ये सेव्हे केला. त्यानंतर त्याने पीडितेला फोन करून सांगितले की, लॉकडाऊनमुळे कॅबला भाडे मिळत नाही, जेव्हा गरज असेल तेव्हा फोन करून सांगा. एकेदिवशी पीडित तरूणीने धनकवडील जाण्यासाठी कॅब चालकाला फोन केला. त्यावेळी आरोपीने पीडित तरूणीला गुंगीचे औषध टाकलेले पाणी प्यायला दिले. गुंगीत असलेल्या तरूणीला ज्यावेळी शुद्ध आली, तेव्हा ती एका धायरीतील एका लॉजमध्ये होती. त्यावेळी तिने आरडाओरडा सुरु केला. मात्र, आरोपीने तिला मोबाइलमध्ये काढलेले तिचे अश्लील फोटो दाखवले. हे देखील वाचा- पुणे जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या 15 वर्षाच्या मुलाने एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी तिच्या राहत्या घराच्या खिडकीत खेळत होती. त्यावेळी तुझी खेळणी खाली पडल्याचे सांगतिले. दरम्यान, खेळणी घेण्यासाठी खाली आलेल्या पीडिताला आरोपीने जवळच्या गार्डनमध्ये घेऊन गेला आणि त्याच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.