Burqa-Clad Muslim Students Denied Entry: मुंबईमधील चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयात बुरखा घातलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला; व्हिडिओ व्हायरल, निषेध सुरु (Watch)
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

गेल्या वर्षी कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरून वाद झाला निर्माण झाला होता. उडुपी येथील एका महाविद्यालयाने सहा हिजाब परिधान केलेल्या मुलींना वर्गात जाण्यापासून रोखले होते. यानंतर मुलींनी महाविद्यालयात निदर्शने केली आणि त्याचे लोण देशभरात पसरले. आता असेच प्रकरण मुंबईमध्ये (Mumbai) समोर आले आहे. चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयात (Chembur’s Acharya College) शिकणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींच्या एका गटाला बुरखा (Burqa) घालून संस्थेत प्रवेश करण्यास मनाई केली गेली. यावेळी कॉलेजमध्ये प्रवेश देण्यासाठी बुरखा काढण्याची सूचना देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

चेंबूरमधील एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजच्या गेटबाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींचे व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हिडिओंमध्ये, दिसत आहे की, बुरखा घातलेल्या मुलींना प्रवेश नाकारण्यात येत आहे. एका विद्यार्थिनीने सांगितले की, ते कॉलेजमध्ये गेल्यावर बुरखा काढणार होते मात्र त्यांना गेटच्या बाहेर तो काढण्याची भीती वाटत होती. गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, कॉलेजच्या प्राचार्यांनी त्याला बुरखा घातलेल्या मुलींना आत जाण्यापूर्वी बुरखा काढण्यास सांगण्याची सूचना केली होती.

सोशल मिडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, बुरखा परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश करण्यास मनाई करण्याच्या प्राचार्यांच्या निर्णयाचा निषेध सुरु झाला आहे. याआधी जूनमध्ये, हैदराबादमधील एका महाविद्यालयाने बुरखा घातलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आणि जोपर्यंत ते बुरखा काढत नाहीत तोपर्यंत ते परीक्षेला बसू शकत नाहीत असा इशाराही दिला होता. (हेही वाचा: Sambhaji Bhide: संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गदारोळ, आक्रमक विरोधकांकडून अटकेची मागणी)

दरम्यान, भारतासारख्या देशात मुस्लिम महिला अनेकदा बुरख्यात दिसतात. बुरखा हे निकाबचेच वेगळे स्वरूप आहे. बुरख्यात डोळेही झाकलेले असतात. साधारणपणे त्याचा रंग काळा असतो. कर्नाटकमधील घटनेनंतर देशात बुरखा परिधान करण्यावरून वाद सुरु झाला, जो न्यायालयात प्रलंबित आहे.