Buldhana Road Accident: भीषण अपघात! बुलढाण्यात लोखंडी सळई घेऊन जाणार डंपर उलटला; 8 जणांची मृत्यू
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

बुलढाण्याच्या (Buldhana) सिंदखेड जिल्ह्यातील (Sindkhed) समृद्धी महामार्गाच्या (Samrudhi Highway) कामाजवळ भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. लोखंडी सळई घेऊन जाणारा डंपर उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. दरम्यान, समोरून येणाऱ्या बसला रस्ता देण्यासाठी चालकाने डंपर बाजूला घेण्याचा प्रयत्न केल्याने डंपर पलटला आणि हा अपघात घडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त डंपर रस्त्यावरून जात असताना चालकाने समोरून येणाऱ्या बसला रस्ता देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात डंपरमधील मजुरांच्या अंगात सळई पाठीत घुसल्याने आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर. अनेक मजूर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत लोकसत्ताने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Jan Ashirwad Yatra: दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण, नारायण राणे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

यापूर्वी सोलापूर अकलूड-वेळापूर रसत्यार एक दिवसापूर्वी दुचाकी आणि कंटनेर यांच्या धडक झाली होती. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबत स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. या अपघातानंतर पपरिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.