Narayan Rane And Uddhav Thackeray (Twitter)

भाजपच्या जनआशीर्वाद (Jan Ashirwad Yatra) यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आणि भाजप नेत्यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन  दर्शन घेतले. मात्र, त्यानंतर शिवसैनिकांनी तात्काळ बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले आहे. यावर नारायणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कारकिर्दीचे सगळ्यात उत्तम काम आहे हे शुद्धीकरण करणे", असे नारायण राणे म्हणाले आहेत. नारायण नाणे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते? हे पाहणे महत्वाचे आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला आज मुंबई सुरुवात झाली आहे. त्यानंतर नारायण नाणे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मारकाला आभिवादन करीत मुंबईतील विविध ठिकाणी भेट दिली. परंतु, नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले आहे. यामुळे शिवसैनिकांनी दूध, गोमुत्र आणि फुले टाकून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले आहे. अप्पा पाटील आणि इतर शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले आहे. हे देखील वाचा- Diksha Shinde: औरंगाबादची कन्या दीक्षा शिंदेला मोठे यश, नासाच्या एमएसआय फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड

राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यातील वाद काही नवा नाही. हे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याचपार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ शुद्धीकरणांवरून यांच्यात आणखी वाद पेटला आहे.