Buldhana Crime News: बुलढाण्यात एक संतापजनक घटना घडली आहे. जिल्हा परिषदाच्या शाळेत शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडीकस आली आहे. या घटनेतील शिक्षकाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवून बेड्या घातल्या आहे. या घटनेनंतर बुलढाणात जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीला पोस्को कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. पालकांच्या मदतीने पीडित मुलीने पोलिसांत या घटनेअंतर्गत तक्रार नोंदवली.
सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना बुलढाण्यात घडली. या घटनेची माहिती पीडित मुलींनी बुलढाणा पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी आरपोली पोस्को कायद्यांतर्गत अटक केले आहे. पीडित मुलीनी दिलेल्या तक्रारीत आरोपी शिक्षकांने वारंवार बलात्कार केला. आरोपी सतीश विक्रम मोरे याच्यावर बुलढाणा पोलिस ठाण्यात कारवाई सुरु आहे. तेरा वर्षाच्या मुलगी आठवीत शिक्षण घेत होती.
हेही वाचा- मॅट्रिमोनियल साइटवर भेटलेल्या पुरुषाचा नवी मुंबईतील महिलेवर बलात्कार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
आरोपीने शिक्षकाने मुलीला जवळ बोलवून बोलेरो कारमध्ये बलात्कार केला. तिचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने पालकांना सर्व घटना सांगितली. पालकांनी जिल्हा पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर पोस्को कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला नोकरीतून निलंबित करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे बुलढाण्यात मोठी खळबळ उडाली आहे.