Accident (PC- File Photo)

बस दुर्घटनेची अजून एक बाब समोर आली आहे. शेगाव (Shegaon) कडून पुण्याकडे (Pune) निघालेली बस पैनगंगा नदीत (Painganga River) कोसळली आहे. मंगळवार (9 मे) रात्री हा अपघात झाला असून एका वृद्ध महिलेचा यामध्ये मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान बस मधील अन्य सारे प्रवासी जखमी असून त्यांना उपचारासाठी नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 3 जण गंभीर जखमी असून अन्य प्रवाशांना मुका मार लागला आहे.

अपघातग्रस्त बस ही स्वरा ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बस होती. रात्री सारेच झोपेत असताना हा अपघात घडला. चिखली रोडवरील पेठ परिसरातील गावाजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून बस थेट 15 फूट खाली कोसळली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. रात्रीच्या अंधारात बस चालकाचा अंदाज चुकला आणि ति थेट खाली कोसळली. मीडीया रिपोर्ट्सनुसार बस पूर्ण उलटलेल्या अवस्थेमध्ये कोसळलेली होती तर मदतीसाठी हाका मारत असलेल्या प्रवाशांच्या मदतीला नंतर तातडीने गावातील मंडळी धावून आली. यानंतर बराच वेळ  दोन्ही बाजूची वाहतूक रेंगाळली होती. Madhya Pradesh, Khargone Bus Accident: मध्यप्रदेश च्या खरगोन मध्ये बस पूलावरून कोसळली; 15 जणांचा मृत्यू .

बुलढाण्यात काल आणखी एक भीषण अपघात झाला. बुलढाणा अजिंठा राज्य महामार्गावरील बुलढाण्यातील धाड नाका परिसरात डस्टर कारला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली. त्यामध्ये सुदैवाने कोणाचा जीव गेला नसला तरीही किरकोळ जखमा झाल्या आहेत.