नातेसंबंध रसातळाला! सख्ख्या भावाकडून बलात्कार, बहीण गर्भवती; आईने दिली नागपूर पोलीसात तक्रार
Brother raped minor sisters in Nagpur | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Brother raped minor sisters in Nagpur: मानवता आणि नातेसबंधाच्या चिंधड्या उडवणारा धक्कादायक प्रकार राज्याची उपराजधानी नागपूर (Nagpur) येथे पुढे आला आहे. सख्या भानेच बहिणीवर बलात्कार केला. या घटनेत बहीण गर्भवती राहीली. पीडितेची प्रकृती खालावत असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या वेळी ती गर्भवती असल्याचे समजले. या प्रकारामुळे तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून, पीडितेच्या आईने हे कृत्य करणाऱ्या स्वत:च्या मुलाविरुद्ध नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस (Hudkeshwar Police Station) ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेतील आरोपी आणि पीडिता दोघेही अल्पवयीन आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पीडितेची प्रकृती गेले काही दिवस सातत्याने खालावत होती. पीडितेची प्रकृती अचानक खालावू लागल्याने कुटुंबीय चिंतेत होते. त्यांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे कुटुंबीयांना धक्का बसला. त्यानंतर हे कृत्य करणारा इसम कोण याबाबत चौकशी करण्यात आली. पीडिता घाबरल्याने सुरुवातीला ती माहिती देण्यास टाळाटाळ करत होती. मात्र, तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता सख्खा भाऊच आरोपी असल्याचे पुढे आले. (हेही वाचा, मर्डर मिस्ट्री: नवरा गेला लग्नाला, दुसरीने काढला तिसरीचा काटा; पहिल्या पत्नीच्या मुलीच्या बॉयफ्रेंडचीही मिळाली साथ; चार आरोपींना अटक)

आरोपी आणि पीडिता आपल्या कुटुंबीयांसोबत नागपूर येथील हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात राहतात. चार महिन्यांपूर्वी घरातील इतर लोक बाहेर गेले होते. पीडिता आणि आरोपी हे दोघेच घरी होते. एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत हे धक्कादायक कृत्य केले. आपल्या मुलानेच सख्ख्या बहिणीसोबत केलेले कृत्य समजताच आईने पीडितेसह हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. दरम्यान, आरोपी हा अल्पवयीन असल्यामुळे सध्या त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.