विकृतीच्या कळसाची परिसीमा गाठणारी एक घटना नागपूर येथे घडली आहे. दिराने वहिनी आणि चार वर्षांच्या पुतणीची हत्या करून, वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे. चंद्रशेखर बिंड (26 वर्ष) असे या नराधमाचे नाव असून तो मुळचा इंदोरचा राहणारा आहे. पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे. सुरुवातीला गुन्हा नाकारणाऱ्या चंद्रशेखरने पोलिसांनी थोडा धाक दाखवल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नागपूरच्या वाडी पोलीस ठाणे हद्दीतील वडधामनानजीकच्या सुराबर्डी तकीया येथे ही घटना घडली आहे. आरोपी चंद्रशेखरने डीफार्म केले असून, तो एका औषधाच्या दुकानात कामाला आहे. त्याच्या नात्यातील भाऊ रोजगारानिमित्त नागपूर येथे आपले वडील, बायको आणि मुलीसोबत राहतो. तर चंद्रशेखर दुसरीकडे आपल्या मित्रांसोबत राहतो. त्याचे आपल्या भावाच्या घरी नेहमीच येणे जाणे होत असे. त्यामुळे भावाच्या कुटुंबासोबत त्याचे घरोब्याचे संबंध होते. पोर्न साईंट्सच्या आहारी जाऊन कामोत्तोजनेतून हे कृत्य केल्याची कबुली आरोपी चंद्रशेखर बिंदने दिली आहे.
मृत महिलेचा पती ट्रक चालक आहे. तो ट्रक घेऊन परगावी गेला होता तर वडील गावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन चंद्रशेखर त्याच्या भावाच्या घरी गेला. मोबाईल पाहण्याच्या निमित्ताने त्याने त्याच्या वहिनीशी लगट सुरु केले. मात्र तिने प्रतिकार केला असता या नराधमाचे तिचा गळा आवळून खून केला. इतकेच नाही तर आपली कामवासना शमवण्यासाठी त्या मुतदेहावर बलात्कार केला. हे कृत्य त्याच्या चार वर्षांच्या पुतणीने पहिले यामुळे चंद्रशेखरने तिलाही मारून टाकले. त्यानंतर चंद्रशेखर फरार झाला.
संध्याकाळ झाली तरी घरातून आवाज येत नाही, म्हणून शेजाऱ्यांनी पहिले असता घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. ताबडतोब त्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली. तपास करत असता पोलिसांना चंद्रशेखरवर संशय आल्याने त्याची कसून चौकशी केली. शेवटी त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.