Bombay High Court कडून अल्पवयीन बलात्कार पीडितेला 29 व्या आठवड्यात गर्भपातास मंजुरी
Bombay High Court | (Photo Credits: ANI)

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नुकतेच अल्पवयीन बलात्कार पीडीतेला(Minor Rape Survivor) गर्भात कोणतेही दोष नसले तरीही गर्भपात करण्यासाठी 29 आठवड्यांपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान मुलींच्या मानसिक आरोग्यावर बलात्कारासारख्या घटनेचा होणारा परिणाम पाहता निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक एक्सपर्ट पॅनल बनवण्यात आले होते. यामध्ये गर्भाचे डीएनए (DNA) आणि रक्ताचे नमूने कायम ठेवण्याच्या सूचना आहेत ज्यामुळे तपास करण्यास, आरोपीच्या मुसक्या आवळण्यास मदत होणार आहे. नक्की वाचा: Thane Shocker: भिवंडी मध्ये 16 वर्षीय गतिमंद मुलीवर कुटुंबातील व्यक्तीकडूनच बलात्कार. 

एका बलात्कार पीडीतेच्या आईने हा कोर्टात धाव घेतली होती त्यावेळी 7 सप्टेंबरच्या सुनावणी दरम्यान बलात्कार पीडीतेच्या वैद्यकीय चाचणीसाठी मेडिकल बोर्ड ऑफ एक्सपर्ट बनवण्याचे जेजे हॉस्पिटलच्या डीनला निर्देश देण्यात आले आहेत. तर 9 सप्टेंबरला बोर्डाने अहवाल सादर केला. गर्भात दोष नसले तरीही अशाप्रकारे आलेले गरोदरपण मुलींच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे. त्यामुळे पॅनल कडून या प्रकरणात गर्भपाताची मंजुरी दिली आहे.

जेजे हॉस्पिटल मध्ये असलेल्या बलात्कार पीडितेसाठी न्यायाधीश Ujjal Bhuyan आणि न्यायाधीश Madhav Jamdar यांनी गर्भपाताची मंजुरी दिली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार 2021 च्या सुरूवातीला अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर ती गरोदर होती. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार यामध्ये नालासोपाराच्या तुळिंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल आहे.