भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या एफआयआरला आव्हान देणारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. हायकोर्टाने अनिल देशमुख यांना निर्देश दिले आहेत की, आवश्यकता असल्यास त्यांचा खटला हायकोर्टाच्या सुट्टीतील खंडपीठकडे स्थलांतरीत करण्यात यावा. देशमुख यांच्या याचिकेवर 4 आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास उच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर होईल.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी निलंबित मुंबई पोलिस अधिकाऱ्याला दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.(वाचा -Anil Deshmukh CBI Inquiry: सीबीआयच्या छापेमारीत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त; जाणून घ्या अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया)
Bombay HC adjourns the petition of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh challenging CBI FIR against him in the corruption matter. HC has asked CBI to file reply on Deshmukh's plea in 4 weeks. The next hearing in the matter will be after the summer vacation of the court pic.twitter.com/EuKzaAwzke
— ANI (@ANI) May 6, 2021
अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावले. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या त्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांचे एपीआय सचिन वाझे यांचे नाव समोर आल्यानंतर वाद वाढला आहे.