Kamala Mills Bomb Threat: मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला शुक्रवार मुंबईच्या लोअर परेल भागातील कमला मिल्स कॉम्प्लेक्स (Kamala Mills) मधील जेएफए फर्म आणि जेएसए कार्यालयाच्या परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा (Bomb Threat) दावा करणारा धमकीचा कॉल आला. कॉलरने जेएफए फर्म (JFA Law Firm) आणि जेएसए कार्यालयाच्या (JSA Office) परिसरात बॉम्ब असल्याचा दावा केला. मात्र कंपनीच्या आवारात झडती घेतली असता काहीही संशयास्पद आढळून आले नाही.
News9live च्या रिपोर्टनुसार, JFA लॉ फर्म आणि JSA ऑफिसला फरझान अहमदच्या कंपनीच्या ईमेल पत्त्यावरून धमकीचा ईमेल प्राप्त झाला. जेएफए फर्मच्या कार्यालयात आणि बल्लार इस्टेट कार्यालयात स्फोटके पेरण्यात आल्याचा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. धमकीचा ईमेल आल्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली आहे. (हेही वाचा -Mumbai Airport Receives Bomb Threat: मुंबई विमानतळावरील CISF नियंत्रण कक्षाला बॉम्बची धमकी; सुरक्षा अधिकारी सतर्क)
A bomb threat call was made to the Mumbai Police Control Room, and a threatening email was sent to the JFA firm and JSA office in Kamla Mills, Lower Parel. The email claimed bombs were planted at the offices. The police and bomb squad conducted a search but found nothing… pic.twitter.com/vI3emqYseY
— IANS (@ians_india) November 15, 2024
दरम्यान, या तक्रारीनंतर मुंबई पोलिस कर्मचारी आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले. पथकाने कंपन्यांच्या आवारात झडती घेतली. परंतु, काहीही संशयास्पद साहित्य सापडले नाही. यापूर्वी गुरुवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाली होती. (हेही वाचा - Fresh Bomb Threats To 25 Flights: बॉम्ब धमक्यांचे सत्र काही थांबेना! 25 हून अधिक फ्लाइट्सला बॉम्बची धमकी)
मुंबई विमानतळ उडवण्याचा कट असल्याचा दावा एका अज्ञात व्यक्तीने केला होता. हा कॉल सीआयएसएफ कंट्रोल रूमला पाठवण्यात आला होता, जिथे कॉलरने मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता, जो स्फोटकांसह मुंबईहून अजरबैजानला जात होता.