Flights | (Photo Credit - X/ANI)

Mumbai Airport Receives Bomb Threat: मुंबई देशांतर्गत विमानतळावरील CISF नियंत्रण कक्षाला (T1) बुधवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीकडून बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाली. मोहम्मद नावाचा एक व्यक्ती स्फोटके घेऊन मुंबईहून अझरबैजानला जात असल्याचा दावा कॉलरने केला. त्वरीत कृती करत, CISF टीमने सहार पोलिस स्टेशनला अलर्ट केले आणि तपासासाठी विमानतळावर अधिकाऱ्यांना तत्काळ तैनात करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, कॉलरने कोणतेही फ्लाइट तपशील सांगितले नव्हते. अधिकारी या कॉलरचा सखोल तपास करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली असून सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रवाशांच्या तपशीलांची पडताळणी करत आहेत. (हेही वाचा - Fresh Bomb Threats To 25 Flights: बॉम्ब धमक्यांचे सत्र काही थांबेना! 25 हून अधिक फ्लाइट्सला बॉम्बची धमकी)

इंडिगोच्या नागपूर-कोलकाता विमानाला बॉम्बची धमकी, रायपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग -

दरम्यान, गुरुवारी सकाळी नागपूरहून 187 प्रवासी आणि 6 क्रू सदस्यांसह कोलकाताला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. त्यानंतर विमानाचे रायपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. रायपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष सिंग यांनी सांगितले की, विमानतळ अधिकाऱ्यांना धमकी मिळाल्यानंतर ते वळवण्यात आले. (हेही वाचा - Bomb Threat to Flights: ईमेलवर धमकीचे संदेश पोस्ट केल्याबद्दल दिल्लीतील एकाला अटक, 'लक्ष वेधण्यासाठी' कृत्य केल्याचा खुलासा (Watch Video))

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील विमानतळावर सकाळी 9 वाजल्यानंतर विमान उतरवण्यात आले. त्यानंतर अनिवार्य सुरक्षा तपासणीसाठी विमान ताबडतोब आयसोलेशनसाठी नेण्यात आले. तांत्रिक कर्मचारी आणि बॉम्बशोधक पथकाकडून विमानाची कसून तपासणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.