(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई मध्ये काल रात्री पोलिस कंट्रोल (Mumbai Police Control Room)  मध्ये आलेल्या निनावी कॉल मुळे शहरात आणि पोलिस विभागामध्ये काही काळ खळबळ पसरली होति. दरम्यान एका निनावी कॉलवरून शहरात चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली आणि नंतर सर्वत्र धावाधाव सुरू झाली. आज सकाळी ANI कडून देण्यात आलेल्या ट्वीट मध्ये मुंबई पोलिसांनी हा निनावी कॉल केवळ अफवा असल्याचं आता स्पष्ट केले आहे. सध्या पोलिसांकडून हा फोन कॉल करणार्‍या व्यक्तीचा आणि लोकेशनचा शोध सुरू आहे.

दरम्यान मुंबईमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर तातडीने बॉम्ब स्कॉड आणि जीआरपी टीम कडून तपास सुरू करण्यात आला. मीडीया रिपोर्ट्सनुसार, मुंबई मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या स्थळांमध्ये सीएसएमटी (CSMT Station), भायखळा (Byculla Station), दादर रेल्वे (Dadar Station) स्टेशन आणि बिग बि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचा (Amitabh Bachchan's Bungalow) समावेश होता. रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत या ठिकाणी पोहचली दोन तास त्यांनी सर्च ऑपरेशन केले मात्र ही केवळ अफवा असल्याने तेथे काहीच सापडलेले नाही. सध्या या ठिकाणी अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  मे महिन्यात मंत्रालयातही बॉम्ब ठेवल्याच्या बातमीने अशी खळबळ पसरली होती.

PTI Tweet

पोलिसांना ज्या नंबरवरुन बॉम्ब ठेवल्याची माहिती देणारा फोन आला त्या नंबरवर कॉल बॅक केल्यावर समोरच्या व्यक्तीकडून माझ्याकडे जी माहिती होती, ती मी तुम्हाला दिली. आता मला डिस्टर्ब करुन नका, असा प्रतिसाद देण्यात आला. त्यानंतर फोन स्विच ऑफ करण्यात आला. हा फोन बंद झाल्याने पोलिसांना त्याचा शोध घेणं कठिण होत आहे.