मुंबई महापालिकेच्या Pothole Challenge नुसार 24 तासात काम पूर्ण न केल्याने विजेत्याची पैसे परत देण्याची इच्छा
Mumbai pothole (Photo credits: PTI)

मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेल्याचे प्रकार समोर आले. या प्रकारांमुळे महापालिकेच्या (BMC) विरोधात रोष व्यक्त केला. त्यानंतर महापालिकेकडून गेल्याच आठवड्यात मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी 'पॉटहोल चॅलेंज' (Pothole Challenge) सुरु केले. यामध्ये 'खड्डे दाखवा आणि पैसे कमवा' अशा पद्धतीचे हे चॅलेंज होते. यामध्ये शिवाजी पार्क मध्ये राहणारा रहिवाशी प्रथमेश चव्हाण विजयी होत त्याला 5,500 रुपये रक्कम देण्यात आली. तर प्रथमेश याने महापालिकेला शिवाजी पार्क, प्रभादेवी आणि सिद्धिवियानकसह 11 खड्डे या ठिकाणांदरम्यान दाखवून दिले. परंतु महापालिकेला या खड्डांबाबत माहिती देऊन सुद्धा 24 तासात त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसल्याचे प्रथमेश याने स्पष्ट केले आहे.

महापालिकेने खड्डे दाखवा, 500 रुपये कमवा हा उपक्रम राबवला होता. त्यानुसार महापालिका एका खड्डानुसार 500 रुपये देणार होता. मात्र प्रथमेश याने पॉटहोल चॅलेंज जिंकत 5,500 रुपये कमवले खरे पण त्याने दाखल केलेल्या तक्रारीचे 24 तासात महापालिकेकडून निवारण करण्यात आले नाही. त्यामुळेच प्रथमेश याला आता महापालिकेने बक्षीस म्हणून दिलेली  रक्कम परत करायची इच्छा असल्याचे म्हटले आहे.(BMC चं मुंबईकरांना Pothole Challenge 2019! पालिकेच्या MyBMC Pothole FixIt App वर 'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा'चं आव्हान)

या चॅलेंजमध्ये विजयी झालेल्या विजेत्यांना वॉर्ड ऑफिसमध्ये पैसे घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यामध्ये शशिकांत भारती आणि यतीन खीर हे माटुंगाचे रहिवासी असून त्यांना 500 रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. याप्रकरणी जी नॉर्थचे इंजिनिअर यांनी असे म्हटले की, विजेत्या पैसे दिले त्याबाबत एवढे काही नाही पण खड्डे बुजवले गेले याचा फार आनंद झाला आहे. चव्हाण याला सर्वात जास्त रोख रक्कम विजेता म्हणून देण्यात आली. कारण त्याने 24 तासाच्या आत 11 खड्डे दाखवले पण त्याला हे पैसे पुन्हा परत करायचे असल्याचे सांगण्यात आले आहे.