मुंबई मध्ये Dadar, Matunga, Mahim, Sion रेल्वे स्थानकाजवळ बीएमसी ला आढळले 21 Mosquito Breeding Spots
Mosquito (Photo Credits: Pixabay)

बीएमसी (BMC) कडून मुंबईत दादर (Dadar), माटुंगा (Matunga), सायन (Sion), माहिम (Mahim) रेल्वे स्थानकाजवळ 21 Mosquito Breeding Spots आढळले आहेत. बीएमसी कर्मचार्‍यांच्या माहितीनुसार, पालिकेकडून राबवल्या जाणार्‍या ‘Mosquito Eradication Campaign’अंतर्गत वॉर्ड स्थरावर मलेरिया, डेंगी ला नियंत्रणात ठेवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. पालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडून पावसाळ्यात हे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आले आहे. या ड्राईव्ह द्वारा पालिकेला 21 ठिकाणी Anopheles Mosquito Larvae Breeding Spots आढळले आहेत. हे रेल्वे स्थानकांवर असलेल्या पत्र्यांवर होते.

मुंबई मध्ये मागील काही दिवसांत तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे आता साथीचे आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. जी नॉर्थ विभागामध्ये दादर, माहिम, धारावी भागाचा समावेश आहे. यंदा Anopheles mosquito larvae आढळतात अशा 400 हाऊसिंग सोसायट्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यापैकी 26 केसेस कोर्टात आहेत. डागडुजीचं काम सुरू असलेल्या इमारतींच्या ठिकाणी पाणी साचून तेथे डासांच्या अळ्या निर्माण होत असल्याचंही पहायला मिळालं आहे. Aedes aegypti mosquito breeding spots हे धारावी मध्ये झोपड्पट्टीच्या ठिकाणी अधिक असल्याचं त्यांनी सांगितले आहे. हे देखील नक्की वाचा: H1N1 Virus in Maharashtra: Swine Flu ने घेतला यंदाचा महाराष्ट्रातील पालघर मध्ये पहिला बळी; आरोग्य यंत्रणा अलर्ट वर .

जुलै महिन्याच्या सुरूवातीला मुंबई मध्ये 119 मलेरिया आणि 19 डेंगी चे रूग्ण आढळले आहेत. तर 1 जानेवारी ते 10 जुलै दरम्यान 1362 मलेरिया रूग्ण आणि 142 डेंगी रूग्ण समोर आले आहेत.