H1N1 Virus in Maharashtra: Swine Flu ने घेतला यंदाचा महाराष्ट्रातील पालघर मध्ये पहिला बळी; आरोग्य यंत्रणा अलर्ट वर
स्वाईन फ्लू Photo Credit : PTI

महाराष्ट्रात पालघर मध्ये स्वाईन फ्लू (Swine Flu) चा यंदाच्या वर्षात पहिला बळी गेला असल्याची बाब समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेस कडून याबाबत वृत्त देण्यात आले आहे. त्यांच्या बातमीनुसार, शनिवारी आरोग्य अधिकार्‍यांनी स्वाईन फ्लू च्या राज्यातील पहिल्या बळीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आश्रम शाळेमध्ये 9 वर्षीय सारिका भगत निमला असं मृत मुलीचं नाव आहे. 10 जुलै दिवशी पालघर च्या तलासरी मधील झाई गावात राहणार्‍या मुलीचं H1N1 Virus मुळे निधन झाल्याचं सांगण्यात आले आहे.

आश्रम शाळेमध्ये तापाची साथ आल्याने हा प्रकार समोर आला आहे. मागील आठवड्यामध्ये राज्य आरोग्य विभागाकडून 224 विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी पथक पाठवण्यात आले होते. त्यामध्ये 13 विद्यार्थ्यांना ताप सदृश्य लक्षणं होती. नमुना चाचणीमध्ये 7 जणांना H1N1 virus तर एकाला झिका वायरसची लागण झाल्याचं समोर आले आहे. नक्की वाचा: स्वाईन फ्लू रोखण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या! 

शाळेपासून 5 किमीच्या भागात आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. मेडिकल स्टेटमेंट नुसार, 15 केसेस या H1N1 virus च्या तलासरी मध्ये आढळल्या आहे. सध्या या सार्‍या रूग्णांची स्थिती स्थिर आहे अशी माहिती Dr Mahendra Jagtap, Maharashtra entomological officer यांनी दिली आहे.

7 वर्षीय मुलगा झिका वायरसची लागण झाल्याने उपचार घेत आहे. ही महाराष्ट्रातील दुसरी केस आहे. यापूर्वी पुण्याच्या बेलसर भागात एक महिला देखील झिका वायरसची लागण झाल्याने उपचार घेत आहे. आश्रम शाळेच्या भागात असलेल्या 95% गरोदर स्त्रिया देखील सध्या निगराणीखाली आहेत. त्यांना डासांपासून संरक्षणासाठी खास बेड नेट्स देण्यात आल्या आहेत.