मुंबईतील सर्व समुद्र किनारपट्टीवर (Mumbai Beaches) जीवनरक्षक (Lifeguards) नेमण्याचा निर्मय मुंबई महापालिकेने (BMC) घेतला आहे. मुंबईत साधारण सहा समुद्र किनारे आहेत. या सर्व कनाऱ्यांवर 120 जीवनरक्षक तैनात असतील. जे समुद्र किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या नागरिकांना खोल समुद्रात जाण्यापासून आणि पाण्यात बुडत असलेल्यांना वाचविण्यासाठी मदत करतील. हे सर्व जीवनरक्षक दोन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम करतील.

समुद्रकिनारपट्टीवर तैनात असलेले जीवनरक्षक प्रामुख्याने समुद्र खवळलेला असताना नागरिकांना पाण्यात जाण्यापासून परावृत्त करतील. अगदिच काही आणिबाणीची स्थिती निर्माण झाली तर ते त्यांना वाचवतीलच परंतू तातडीने इतरही मदत उपलब्ध करुन देतील. बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, मुंबई महापालिकेने दिली आहे. (हेही वाचा, BMC on Siddhivinayak Temple: मुंबई महापालिकेची सिद्धिविनायक मंदिराला नोटीस, ज्वलनशिल पदार्थांचा साठा केल्याचा आरोप, लाडवाचा कारखानाही अनधिकृत)

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर नुकताच एक मोठा अपघात झाला होता. ज्यात सहा जणांचे प्राण गेले होते. समुद्राला भरती असताना आणि खास करुन बिपरजॉय वादळाचा परिणाम म्हणून उंचच उंच लाटा किनाऱ्यावर उधळत असताना हे पर्यटक पाण्यात शिरले होते. या अपघातानंतर बीएमसीने तातडीने कारवाई करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)