मुंबई महानगर पालिकांच्या कर्मचार्‍यांना 'दिवाळी बोनस' जाहीर
BMC Bonus | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात सध्या सार्‍यांचेच लक्ष आगामी विधानसभा निवडणूक 2019 (Vidhan Sabha Elections) कडे लागले आहे. येत्या काही दिवसातच त्यांच्या तारखांची निवडणूक आयोगाकडून घोषणा होणार आहे. मात्र त्या जाहीर होण्याआधीच आज (19 सप्टेंबर) दिवशी मुंबई महानगर पालिकांच्या कर्मचार्‍यांना (BMC Employee) 'दिवाळी बोनस'(Diwali Bonus) जाहीर करण्यात आला आहे. यंदाही मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्‍यांना सुमारे 15,000 रूपयांचा बोनस मिळणार आहे. राज्यात निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला हा बोनस विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडून अडकून राहू नये यासाठी त्याची घोषणा यंदा दसरा, दिवाळी सणापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे हा पालिका कर्मचार्‍यांसाठी एक सुखद धक्का आहे. खुशखबर! 11 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळणार, मोदी सरकारचा निर्णय

काल (18 सप्टेंबर) केंद्र सरकार कडून रेल्वे कर्मचार्‍यांनादेखील दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. आता रेल्वे कर्मचार्‍यां पाठोपाठ मुंबईमध्ये पालिका कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आहे. महापालिकेतील नियमित वेतन श्रेणीतील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त हा बोनस मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांना यंदा दिवाळी बोनस मिळणार; महापौर मुक्ता टिळक यांची माहिती

सध्या निवडणूक आयोगाचे एक शिष्टमंडळ राज्यात विविध ठिकाणी पहाणी करत आहे. काल निवडणूक आयोगाने दिलेल्या मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. मात्र निवडणूकांचे वेळापत्रक, कार्यक्रम यांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच त्याबद्दल घोषणा केली जाईल.