Blast (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

Blast In Thane: आज सकाळी बिबट्याच्या दहशतीनंतर ठाणे परिसरात एका सौम्य स्वरूपाच्या धमाक्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ठाणे पश्चिम भागामध्ये काशिमिरा रोड ( Kashimira road ) भागात हा प्रकार घडला आहे. एका संशयित व्यक्तीने प्लॅस्टिकचा बॉल फेकून धमाका झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाकूर मॉल (Thakur Mall)  जवळून जाताना  बाइकर्सनी या धमाक्याची बातमी पोलिसांना दिली.   यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. आज (20 फेब्रुवारी) सकाळी दहाच्या सुमारास हा धमाका झाल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे. Leopard spotted in Thane: ठाण्यातील सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये सापडला बिबट्या; जेरबंद करण्यात यश (Video)

काशिमिरा भागामध्ये स्थानिक पोलिस आणि त्यांच्या सोबतीने बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्वॉड आहे. अ‍ॅन्टी टेरर स्क्वॉड आहे. धमाका झालेल्या ठिकाणाहून प्लॅस्टिक बॉटल, मेटल यांचे नमुणे घेण्यात आले आहेत. या प्रकारानंतर ठाणे परिसरात अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक तपासामध्ये या धमाक्यामध्ये अत्यंत लहान डिव्हाईस वापरण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे इजा किंवा घातपात होण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. Mumbai: बेफिकीर तरूणाने मजे-मजेत WIFI चं नाव ठेवलं 'Lashkar-E- Taliban', कल्याणमध्ये भीतीचं वातावरण

14 फेब्रुवारी दिवशी जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी संघटनेने भारतीय सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 हून अधिक जवान ठार झाले. त्यानंतर काश्मिरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन झाले. यामध्ये तीन दहशतवादी ठार करण्यात भारताला यश आलं. जम्मू काश्मिर मधील या हल्ल्यानंतर सध्या देशभरामध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.