WiFi (Representational Image)

पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान केवळ मजे मजेमध्ये वाय - फायचं नाव 'Lashkar-E- Taliban' (लष्कर -ए- तालिबान) ठेवल्याने कल्याणमध्ये (Kalyan) एका रहिवासी सोसायटीमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होते. पोलिसांच्या तापासणीमध्ये एका 20 वर्षीय तरूणाने हा आगाऊपणा केल्याचं समोर आलं आणि सार्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नाशिक: देवळाली रेल्वेस्थानक उडवू देऊ या निनावीपत्रानंतर आज संशयास्पद बॅग सापडल्याने खळबळ

अमृत हेवन कॉम्ल्पेक्स खडकपाडा ( Amrut Heaven Complex, Khadakpada) या रहिवासी सोसायटीमध्ये रविवारी संध्याकाळी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. एक व्यक्ती वाय फाय कनेक्शन शोधत असताना त्याला Lashkar-E- Taliban हे नाव सापडलं. या नावामुळे काहीसा घाबरलेल्या त्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर रहिवासांना याबाबात माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा आणि खातरजमा करून घेण्यासाठी रहिवाशांनी पोलिसामध्ये तक्रार नोंदवली.

पोलिस तपासामध्ये जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा वीस वर्षीय तरूणाने हा प्रकार केवळ मज्जा मस्तीचा भाग म्हणून केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्याची योग्य रित्या कानउघडणी केल्यानंतर पोलिसांनी त्याला घरी सोडले आणि तात्काळ वाय फायचं नाव बदलण्यास सांगितलं.

सध्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही समाजकंटकांकडून चूकीची माहिती, फेक न्यूज, असंवेदनशील फोटो आणि कमेंट्स शेअर केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करताना भान ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.