Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Blast in Purna- Hyderabad Passenger: पूर्णा- हैद्राबाद पॅसेंजरमध्ये काही वेळापूर्वी स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे. ही पॅसेंजर गाडी परळी स्टेशनवर उभी असताना ही गंभीर घटना घडली आहे. दरम्यान आज झालेल्या या स्फोटमध्ये एक तरुण गंभीर झाला आहे. सय्यद अक्रम असं स्फोटामध्ये जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.

जखमी झालेला तरुण पूर्णा- हैद्राबाद या पॅसेंजर गाडीने त्याच्या कुटुंबासमवेत प्रवास करत होता. परंतु, ही पॅसेंजर गाडी जेव्हा परळी रेल्वे स्थानकात पोहोचली तेव्हा रेल्वेचे इंजिन बदलण्याचे काम सुरू होते. परंतु, एका डब्यातील शौचालयात स्फोट झाल्याचा आवाज आला आणि प्रवासी धावपळ करायला लागले. नंतर काही प्रवाशांनी ज्या शौचालयातून स्फोटचा आवाज आला त्याचा दरवाजा उघडला असता त्यात एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आढळला.

हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप रेल्वे प्रशासकडून सांगण्यात आलेले नाही. स्फोट झाल्याच्या दहा मिनिटांनंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी तरुणाला ताबडतोब रुग्णालयात हलविले.

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण: शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यासह 163 जणांना जिल्हाबंदी

दरम्यान, जखमी झालेल्या सय्यद अक्रम याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच स्फोट नेमका कशामुळे झाला होता, याचा तपास अजूनही रेल्वे पोलीस करत आहेत.