मुंबई लोकल (Mumbai Local) मध्ये एका तरूणावर ब्लेड हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ठाणे ते कळवा स्थानकामधील (Thane -Kalwa Station ) आहे. सोमवार 6 नोव्हेंबर दिवशी ठाणे रेल्वे पोलिसांकडे त्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.
मुंब्रा येथे राहणारा 18 वर्षीय तरूण कल्याण स्लो लोकलने शनिवार 4 नोव्हेंबर दिवशी प्रवास करत होता. रात्री दिव्यांगांच्या डब्ब्यातून प्रवास करताना हा प्रकार घडला आहे. डब्ब्यामध्ये एका सह प्रवाशासोबत त्याचा किरकोळ वाद देखील झाला. ट्रेन ठाणे ते कळवा दरम्यान असताना त्या व्यक्तीने हल्ला केला. ब्लेडने त्या व्यक्तीच्या नाकाजवळ आणि डोळ्याजवळ हल्ला करण्यात आला. मुंब्रा स्थानका मध्ये उतरल्यानंतर पोलिसांनी हल्ला झालेल्या प्रवाशाला नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले. असे लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे.
सोमवारी तरूणाने ठाणे लोहमार्ग पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: Crime: लोकल ट्रेनमध्ये 17 वर्षीय तरुणीसह तिच्या दिव्यांग मावशीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरूणाला न्यायालयाने 3 वर्षे कारावासाची सुनावली शिक्षा.
मुंबई लोकल मध्ये अशाप्रकारे प्रवाशांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी देखील महिला प्रवाशांवर हल्ल्याच्या घटना झाल्या आहेत. दीड वर्षांपूर्वी चर्नी रोड स्थानकामध्ये साखळीचोर सोबत हाणामारी झाली होती.