नाशिकमध्ये मनसे-भाजप एकत्र; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने भाजपचे सतीश कुलकर्णी यांची महापौरपदी निवड
Devendra Fadnavis And Raj Thackeray (Photo Credit: PTI)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात नवा बदल घडताना दिसत आहे. नाशिक (Nashik Mayoral Election 2019) येथील महापौर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) मदतीने भारतीय जनता (BJP) पक्षाचे सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांची महापौरपदी निवड झाली आहे. आज सकाळी झालेल्या निवडणुकीत सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, 10 नगरसेवकांनी बंडखोरी मागे घेऊन पक्षाला पाठिंबा दिल्याने भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक येथे होणाऱ्या महापौर निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या नेत्याला महापौरपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच आज सकाळी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 5 नगरसेवकांनी भाजपला साथ दिली. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत. त्याचबरोबर भाजपच्या 10 नगरसेवकांनी बंडखोरी मागे घेऊन पक्षाला पाठिंबा दिला आहे. यामुळे नाशिकच्या महापौरपदी भाजपचे नेत्याची निवड झाली आहे. दराम्यान, शिवसेनेने पुढाकार घेऊन नाशिक येथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्याचा प्रयत्न केले होते. यातच भाजपने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सानप यांच्यासह 10 ते 15 नगरसेवक शिवसेनेत गेले होते. त्यामुळे 65 नगरसेवक असतानाही भाजपची अडचण वाढली होती. मात्र त्यावेळी मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपला नाशिक येथे आपला महापौर मिळाला. हे देखील वाचा-भाजपला मोठा धक्का! लातूर महानगर पालिकेत बहुमत असतानाही काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौरपदी

नाशिक महापौर निवडणुकीत भाजपला धक्का बसण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र,नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. त्यामुळे महाजन पुन्हा भाजपचे संकटमोचक ठरले आहेत.