
लातूरनंतर उल्हानगर (Ulhasnagar) येथे पार पडलेल्या महापौर निवडणुकीतही (Ulhasnagar Mayoral Election 2019) भाजपला (BJP) आणखी एका धक्का सहन करावा लागला आहे. उल्हानगर येथील महापौर निवडणुकीत टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादी नगरसेवकांच्या पाठिंब्याने शिवसेनेच्या महापौर लिलाबाई आशान (Lilabai Ashan) यांचा विजय झाला आहे. शिवसेनेने अवघ्या अडीज वर्षातच भाजपकडून सत्ता हिरकावून घेतली आहे. उल्हासनगर महापालिकेत 2017 मधील निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला सोबत न घेताच पहिल्यांदा टीम ओमी कलानी आणि साई पक्षाच्या समर्थनाने सत्ता स्थापन केली होती. मात्र, नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने कलानी कुटुंबाच्या समर्थक नगरसेवकांची शिवसेनेशी जवळीक वाढली होती. यामुळेच भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्याचे समजत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाला महापौरपद गमवाव लागले आहे. त्यानंतर उल्हासनगरमध्येही महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांची निवड झाली असून लातूर पाठोपाठ उल्हासनगर मध्येही भाजपला हा दुसरा धक्का लागला आहे. राज्यात आकाराला येत असलेल्या नव्या आघाडीचा परिणाम पालिकेतही पाहायला मिळत आहे. खुल्या गटासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदासाठी भाजपाकडून सभागृह नेते जमनादास पुरस्वानी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, साई पक्षाकडून उपमहापौरपदावर असलेले जीवन इदनानी यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हे देखील वाचा- नाशिकमध्ये मनसे-भाजप एकत्र; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने भाजपचे सतीश कुलकर्णी यांची महापौरपदी निवड
उल्हासनगर महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे एकूण 31 नगरसेवक आहेत. भाजपाला महापालिकेत साई पक्षाच्या एकूण 12 नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला होता. यामुळे भारतीय जनता पक्षाला अडीच वर्षांपूर्वी 40 नगरसेवकांच्या बहुमताचा आकडा गाठणे शक्य झाले होते. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर एकूणच राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे.