Shivsena | (Photo courtesy: archived, edited images)

विधानसभा निवडणुकी जागा वाटपापासून ते निकालापर्यंत भाजप- शिवसेना दोन्ही पक्षात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलने दर्शव्यनुसार भाजप शिवसेना महायुती 220 हुन अधिक जागांवर विजय संपादन करणार होती. परंतु आता मात्र भाजपला 105 जागी समाधान मानावं लागलं तर शिवसेनेला 56 जागी विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजप आपला सरकार स्थापन करू शकणार नसल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून असून बसले आहेत.

याचं प्रत्युत्तर म्हणून सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी टीका थांबत नाही तोपर्यंत शिवसेनेशी चर्चा करायची नाही अशी भूमिका भाजपनं घेतल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनी ने दिली आहे. त्याचबरोबर भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा उद्याचा मुंबई दौरासुद्धा अनिश्चित मानला जात आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजप श्रेष्ठींवर अनेक टीका होत आहेत ज्यामुळे भाजपात अस्वस्थता परसली आहे. आणि अशाच टीका कायम राहिल्यास भाजप सेनेकडे सत्तास्थापनेसाठी कुठलाही प्रस्ताव न देण्याच्या विचारात असल्याचे देखील एबीपी माझाने माहिती दिली आहे.

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना सत्ता स्थापनेनंतर मिळू शकते या तीन मंत्रालयांची जबाबदारी

कालच्या सामनाच्या आवृत्तीमध्ये अग्रलेखात म्हटलं होतं की, 2014 साली स्वतंत्र लढूनही भाजपानं 122 शिवसेनेनं 63 जागा जिंकल्या. यावेळी स्वतःकडे सत्ता, युतीचं पाठबळ असूनही शिवसेना 56 वर थांबली. हा आकडा लहान वाटत असला तरी सत्तेचा रिमोट उद्धव ठाकरेंच्या हाती आला आहे. आयारामांचा जो बाजार भरवला तो शेअर बाजारासारखा कोसळला. तसेच 106 जागा जिंकूनही भाजपाच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, असं शिवसेनेनं सामनात म्हटलंय